राष्ट्र गीत - जन गण मन
जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता |
पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा,
द्राविड, उत्कल, बंगा,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल, जलाधि तरंगा,
त व शुभ नामे जागे
त व शुभ आशिष मागे
गाये तव जय गाथा,
जन गण मंगल दायक जय हे,
भारत भाग्य विधाता |
जय हे | जय हे | जय हे |
जय जय जय जय हे
- रवींद्रनाथ टागोर
समूह गीत - झंडा गीत
विजयी विश्व तिरंगा प्यारा |
झंडा ऊंचा रहे हमारा | |
सदा सक्ती बरसाणे वाला |
प्रेम सुधा सरसाणे वाला ||
विरों को हरषानेवाला |
मातृभूमी का तन मन सारा ||
स्वतंत्रता के भीषण रन मे |
लढकर बढे जोश क्षण क्षण मे ||
कांपे शत्रू देख कर मन मे |
मीट जाये भयसंकट सारा ||
इस झंडे के निचे निर्भय ले
स्वाज्य यह अविचल निश्चल
बोलो भारत माता की जय |
स्वतंत्रता की ध्येय हमारा ||
आओ प्यारे विरों अाओ |
देश धर्म पर बली बली जाओ ||
एक साथ सब मिलकर गाओ |
प्यारा भारत देश हमारा ||
इसकी शान न जाणे पाएं |
चाहे जान भलेही जाए |
विश्व विजय कर के दिखलाए |
तब होवे प्रण पूर्ण हमारा ||
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा.....
राष्ट्रीय गीत - वंदे मातरम्
वंदे मातरम् | वंदे मातरम् |
सुजलाम्, सुफलाम् मलयज शितलाम्
सस्यशामलांम्, मातरम् |
वंदे मातरम् |
शुभ्र ज्योत्स्ना, पुळकित्यामिनिम,
फुल्लकुसुमित - द्रमदल - शोभिनिम्,
सहासिनिम् सुमधुर - भाषिणीम्
सुखदाम्, वरदाम्, मातरम् |
वंदे मातरम् | वंदे मातरम् |
- बंकिमचंद्र चॅटर्जी
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन व प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यातच माझे सौख्य सामावलेले आहे.
भारताचे संविधान
आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस :
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता ;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
- ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर