आता सगळेच लोक कम्प्युटर वापरतात मोबाईल तर वापरतात ते लहान मुलं असोत किंवा वयस्कर माणसे असोत मनोरंनासाठी मोबाईल किंवा लॅपटॉप चा वापर करतात, नौकरी करत असलेले लोक आपल्या ऑफिस मध्ये त्यांना दिवसभर कम्प्युटर स्क्रिन समोर बसून राहतात आणि काही लहान मोठी मुलं दिवसभर मोबाईल वर गेम खेळत असतात.
तर खूप वेळापासन डोळ्यांचा फोकस मोबाईल किंवा कम्प्युटर क्या स्क्रीन वर राहिला तर आपल्या डोळ्यांवर खूप दबाव पडतो आणि हाच कारण असते कम्प्युटर विजन सिंड्रोम होण्याचा.
कम्प्युटर विजन सिंड्रोम,
हा एक आपल्या डोळ्यांच्या रोगांचा समूह आहे, कम्प्युटर विजन सिंड्रोम. ज्याला डिजिटल आय स्ट्रेन म्हणूनही ओळखले जाते, खूप वेळा पासून स्मार्टफोन कंप्यूटर टॅब्लेट वापरामुळे डोळ्यावर परिणाम करणारी बिमारी सारखे असते. एक बिमारी नाहीये डोळ्यांचा दुखण्याचा समूह आहे. एक रिसर्च झाल्यानंतर हे माहीत झाालं की मोबाईल वर खेळणाऱ्या मुलांना आणि ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना होत आहे, जे लोक एक सारखे तीन घंटे पर्यंत स्क्रीन समोर राहतात त्या लोकांना याची जास्त भीती आहे.
कम्प्युटर विजन सिंड्रोम चे लक्षण,
- डोळ्यांमध्ये तणाव
- डोके दुखणे
- बुरसट दिसणे
- कोरडे डोळे
- मान, पाठ आणि खांदे मध्ये दुखणे
- दूर आणि जवळ फोकस बदलण्यात त्रास
- डोळ्यात आग, लाल डोळे
कम्प्युटर विजन सिंड्रोम वर उपाय,
- कम्प्युटर स्क्रीन समोर जेव्हा तुम्ही बसता तेव्हा एंटी ग्लेयर चष्म्याचा वापर करा.
- कम्प्युटर स्क्रीन ला डोळ्यापासून 15-20 डीग्री खाली ठेवा.
- डिजिटल स्क्रीनवर मनोरंजन जास्त बघत जाऊ नका.
- बरोबर पोझिशनमध्ये बसून काम करा.
- 20-20-20 नियमाचे पालन करा, प्रत्येक वीस मिनिटांनी 20 फिट दूर 20 सेकंड बघण्याचा ब्रेक घ्या.
- पुन्हा पुन्हा डोळे झाकून उघडण्याचा प्रयत्न करा.
- कम्प्युटरची स्क्रीन डोळ्यांपासून 20-25 इंच दूर ठेवा.
- डोळ्यांचा चेकअप करत रहा.
- जास्ती वेळ स्क्रीन समोर न राहण्याचा प्रयत्न करा.
- वेळेवर डॉक्टरची मदत घ्या.
तुम्हाला तुमच्या डोळ्या बद्दल कशाचाही त्रास झाला तर तेव्हाच्या तेव्हा डॉक्टरला जाऊन विचारायला हवे. माझ्या मित्राला मोबाईलवर गेम खेळून खेळून डोळ्याचा त्रास सुरू झाला होता पण आता तो मोबाइल स्क्रीन समोर तेवढा राहत नसल्यामुळे तो बरा आहे, तुम्हालाही असं काही होण्याच्या पहिले लक्षात ठेवायला पाहिजेत की आपल्याला आपल्या डोळ्यांची काळजी करायला हवी,
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून प्रतिक्रिया द्या,
धन्यवाद.