पर्यावरणीय समस्या : जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायु प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, वाहन प्रदूषण, मृदा प्रदूषण, कचरा प्रदूषण

प्रदूषण एक पर्यावरणीय समस्या

 धी पृथ्वीतलावर कसं सगळीकडे हिरवेगार थंड वातावरण स्वर्गासारखे वाटायचे. पण आता मात्र प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रदूषण स्वर्गासारख्या पृथ्वीला नरकात रूपांतर करत आहे. पण हे होत कशामुळे आहे, पृथ्वीची ही दशा कोण करत आहे, तुम्ही स्वतःला कधी हा प्रश्न विचारला का? प्रदूषण या समस्येला आपणच कारणीभूत नाही का आहोत. प्रदूषण ही समस्या माणसाच्या उत्पत्तीमुळेच तर नाही का आली असावी, जो पर्यंत माणूस विकसित व्हायचा होता बाकी सगळ्या प्राण्यांसोबत तो एक प्राणी म्हणून राहत होता. अजिबात लालच नव्हता, स्वतःची भूक भागवून मरून जायचं. दिवसेंदीवस माणूस अतिशहाणा बनू लागला आणि त्याची भूक वाढत गेली, लालच निर्माण झाले विकासाचा पाया पकडला. नाण्याच्या जश्या दोन बाजू असतात तशा मला वाटते विकासाच्याही असाव्या, एक चांगले आणि एक वाईट. म्हणूनच विकासाची एक चांगली बाजू दिसते आणि वाईट बाजू दुर्लक्ष होते ती म्हणजे प्रदूषण.

जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायु प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, वाहन प्रदूषण, मृदा प्रदूषण, कचरा प्रदूषण
प्रदूषण
 कोणत्याही चांगल्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचा निकामी कचरा फेकून दिला जातो, त्याचाच रूपांतर प्रदूषणात होते. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे हे या काळाची गरज झाली आहे.
प्रदूषणाच्या निर्मिर्तीवरून प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार पडतात यावर सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

जल प्रदूषण

जल प्रदूषण हा पाण्याशी संबंधित असल्याने त्यात अनेक कारणे आहेत ज्याने जल/पाणी प्रदूषित होते. रासायनिक कारखण्यातून निघणारा प्रक्रिया केलेला विषारी सांडपाणी हा नदी नाल्यात सोडला जातो आणि त्यामुळे जनावरे तो पाणी पिऊन बिमार पडू शकतात. त्यासाठी दूषित पाण्याला फिल्टर करूनच बाहेर टाकण्याची सोय त्या कारखान्यात करण्यात यायला पाहिजेत. पुन्हा एक कारण म्हणजे गावात किंवा खेड्यात विहरिवर किंवा तळ्यात कुणी गुरे/ढोरे धुवायला जातो, कुणी स्त्रियांचे कपडे धूने असे इतर कामे चालू असतात त्यामुळे तळ्यात कोणी अंगोळ केली तर त्याच्या शरीरावर आणि तो पाणी जेथे वापरला जाईल तिथे जंतू संसर्ग होण्याचा धोका असतो.

ध्वनी प्रदूषण

ध्वनी प्रदूषण प्रदूषण आवाजामुळे होण्याचे खूप करणे आहेत. मुख्य कारणं म्हणजे कुठे कार्यक्रम असेल तर लाऊडस्पीकर मुधून अतोनात निघणारा आवाज यामुळे होणारा ध्वनी प्रदूषण, आजकाल लग्नसमारंभात मोठ-मोठे फटाके फोडून डिजे च्या आवाजावर वराती नाचत जात असतात त्या आवाजामुळे होणारा ध्वनी प्रदूषण, मोटार गाड्या रस्त्यावरून जात असताना साईड मिळावी म्हणून जोरजोरात हॉर्न वाजवतात त्यामुळे होणारा ध्वनी प्रदुषण अश्या इतर कारणांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता कमी होत जाते आणि बहिरे होण्याचा भय असतो यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कठोर निर्बंध किंवा कमी प्रमाणात, लिमिट मध्ये वापरण्याचे नियम आदेश देण्यात आले पाहिजेत हे नियम नाही पळतील त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला पाहिजे.

वायु प्रदूषण

वायू प्रदूषण हवेमार्फत होतो. मोठ मोठ्या फॅक्ट्र्या विषारी धूर वर सोडतात त्यामुळे हवा खूप प्रमाणात प्रदूषित होते ते लोकांच्या नका तोंड गेले तर बिमाऱ्या निर्माण होतील त्यासाठी अश्या फॅक्टर्याची चिमणी, धूर वर सोडण्याची पाईप उंच अंतरावर असायला हवे जेणेकरून तो धूर लोकांपर्यंत पोहोचत आकाशात विरघळून जाईल. त्याच प्रमाणे मोटार गाड्या रस्त्यावरून जात असताना त्यांमधूनही धूर बाहेर सोडला जातो त्याला आपल्याला रोज सहन करावे लागते पण आपण बिमार होणार याकडे जास्त लक्ष देत नाही त्यासाठी आपल्याला मास्क लावले पाहिजे किंवा वाहन चालकांनी गाडीमध्ये फिल्टर लावले पाहिजे त्याने प्रदूषण कमी करण्यात मदत होईल. 

प्लास्टिक प्रदूषण

प्लास्टिकचे वस्तू किंवा प्लास्टिक पिशव्या सगळी कडे वापरल्या जातात यांच्या मुळे प्रदूषण होतो तो असा की हे प्लास्टिक वातावरणात, जमिनीत किंवा पाण्यात विरघळत नाही व ते कुजतही नाहीत. ते जमिनीवर फेकले तर पाळीव/जंगली प्राणी खातील, पाण्यात टाकले तर पाण्यातले मच्ची, मगर तसेच इतर जीव खातील आणि याचे पचन न झाल्यामुळे त्यांच्या जीवाची हानी होईल. आपण निर्माण केलेल्या प्लास्टिक मुळे पृथ्वीवरच्या दुसर्यांना धोका होत आहे. याची विल्हेवाट आपल्यालाच लावायला पाहिजे म्हणून प्रशासनाला प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणली पाहिजेत त्यावर पर्याय म्हणून कागद किंवा कापडाचा वापर केला पाहिजेत. आपणही प्लॅस्टिकचा वापर करणे टाळले पाहिजे आणि लोकांना या संदर्भात जागृत केलं पाहिजे, कुठे प्लास्टिक आढळले तर ते जमा करून संपूर्ण जाळून टाकले पाहिजेत.

वाहन प्रदूषण

मोटार गाड्या मुळे होणारा प्रदूषण हा त्यांच्या वापरावर अवलंबून आहे. वर आपण जाणले की वारंवार हॉर्न वाजवल्याने ध्वनी प्रदुषण होते. वेग वेगळ्या इंधनामुळे निघणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषण होते त्या व्यतिरिक्त ह्या गाड्या कुचकामी झाल्यावर तसेच पाडून ठेवतात त्यांचा धातू गंजते तर जमत नाही आणि त्याचा योग्य निचरा होत नाही. मग हे असेच प्रतिवर जागा व्यापून बोजा बनून असतात.

मृदा प्रदूषण

मृदा प्रदूषण जमिनीत रासायनिक खतं फवारल्याने होत असतो. त्याचा परिणाम जमिनीवर असलेल्या लहान लहान कित्कांवर होत असतो किंवा जमिनीची दशा बदलत असते तिची स्थिती काही उगविण्याची पिकविण्याची राहत नाही. मृदा प्रदूषणमुळे जमीन बंजर बनते. मृदा प्रदूषनवर नियंत्रण करण्यासाठी रासायनिक खता ऐवजी गांडूळ खत उपयोगात आणायला पाहिजे. जे नैसर्गिक खत मिळतात त्यांचा जास्तीत जास्त वापर करायला हवे.

कचरा प्रदूषण

कधी विचार केलाय आपण कचरा किती करतोय ते! आपण केलेला कचरा कुठे टाकतो, त्याचा काय होते. त्यामुळे किती कचरा प्रदूषण होत आहे त्यानेच की काय आपण बिमार पडत आहो. आपण फेकलेला कचरा इतर कुठेही ना टाकता कचरा कुंडीत टाकायला हवे. सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा जमा करावा लागतो हे तरी ठाऊक आहे की नाही. सुका कचरा असेल तर त्याला जाळून टाकले पाहिजे आणि ओला कचरा असेल तर तो जमिनीत खड्डा करून मुरून जाऊ दिले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट करून सांगा.

Leave a Comment