सर्व भारतीय मोबाईल नेटवर्क कंपन्यांना खूप मोठा टॅक्स भारत सरकारला द्यायचे असल्यामुळे सगळ्यांनी आपापले रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत, साधा इंटरनेट वापरायचे असेल तर आपल्याला तीनशे रुपयांचा वरचा रिचार्ज मारावा लागते आणि त्या मध्येच आपल्याला 28 दिवसापर्यंत सीम चालू ठेवायची असेल तर प्रत्येक महिन्याला व्हॅलिडीटी पॅक वेगळे मारावे लागते. तर असे प्रत्येक महिन्याला व्हॅलिडीटी तुम्हाला त्रास येत असेल तर खाली काही गोष्टी सुचवले आहे ते तुम्ही करू शकता दर महिन्याला व्हॅलिडीटी मारण्यापासून मुक्त होऊ शकता.
1. सिम पोर्ट करणे.
सगळ्यात आधी जानुन घेऊया आपण सिम पोर्ट करणे म्हणजे काय असतं ?
तर सिम पोर्ट करणे म्हणजे आपला मोबाईल नंबर न बदलता आपली सिम कार्ड दुसऱ्या कंपनीने बदलणे होय. ही सेवा विनामूल्य असते. आणि हे दोन-तीन दिवसात पूर्ण होऊन जाते.
सिम पोर्ट करण्यासाठी काय करावे लागेल ?
तुम्हाला जर सिम पोर्ट करायचे असेल तर सर्व प्रथम ज्या नंबरची सेम बदलायचे असेल त्या नंबर वरून PORT असा मेसेज 1900 या नंबर वर पाठवावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबर वर मेसेज येईल त्याच्यामध्ये UPC लिहिले असेल ते फक्त ज्या सिम कंपनी मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पोर्ट करायचा आहे त्यांच्या ऑपरेटर कडे जाऊन दाखवावा लागेल त्यानंतर त्यानं तुमच्या मोबाईलवर डिजिटल केवायसी कस्टमर कोड येईल त्यासाठी तुमचा आधार कार्ड आवश्यक असेल मग बाकीचे प्रोसेस तेच ऑपरेटर करून त्यांच्या सिम कार्ड देतात. आणि मग तुम्हाला नवीन सिम मिळाल्यानंतर तुमची जुनी सिम बंद होण्यास एक दोन दिवस लागतील आणि ती बंद झाल्यावर तुम्हाला नवीन मिळालेली सिन मोबाईल मध्ये टाकायची आहे आणि त्या मधून 1507 हा क्रमांक डायल करून टेले व्हरिफिकेशन करून घ्या त्यानंतर तुमच्या नवीन सिम वापरण्यास सुरुवात होईल.
सिम पोर्ट कॅन्सल करण्यासाठी काय कराल ?
जर तुमच्याकडून पोर्ट असा मेसेज चुकिने पाठवला गेलेला असेल तर तुम्ही धोक्याचं करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्याच मोबाईल नंबर वरून cancel (तुमचा मोबाईल नंबर) असा मेसेज 1900 या नंबर वर पाठवावा लागेल.
यावेळी सिम पोर्ट कोणत्या कंपनीमध्ये करायला पाहिजे ?
यावेळी सर्व नेटवर्क कंपन्यांचे प्लॅन्स रिचार्ज महागल्या आहेत पण एक कंपनी अशी आहे जी पूर्वीपासून स्वस्त आहे ती म्हणजे बीएसएनएल होय. तुम्हाला बीएसएनएल मध्येच तुमची सिम पोर्ट करायला पाहिजे असे मला वाटते कारण bsnl मध्ये तुम्हाला बाकीच्या कंपनी पेक्षा स्वस्त रिचार्ज प्लॅन्स मिळतील. तुम्हाला विश्वास नसेल वाटत तर खाली 2020 या वर्षीच्या नवीन रिचार्ज प्लॅन्स च्या योजना दिलेले आहेत ते बघू शकता.