अफ्फिलीएट मार्केटिंग म्हणजे दुसर्याच्या कंपनीचा प्रॉडक्ट दुसरे लोक घ्यावे म्हणून त्यांना आपण रेफर करणे होय.
आता समजा एखादी कंपनी आहे जिथे त्यांचे प्रॉडक्ट वेगवेगळे विकले जातात आणि ते तुम्हाला दुसऱ्या कुणाला तरी विकायचे आहेत आणि बाकीचे लोक घेतल्यानंतर तुम्हाला तुमची अफ्फिलीएट कमिशन मिळेल.
तुम्हाला जी कमिशन मिळेल त्याचा ओरिजनल किमती वर काही प्रभाव पडणार नाही, म्हणजे जित्याची ओरिजनल किंमत आहे तीच किंमत कंपनी विकेल आणि घेणारा घेईल त्यातुनच तुम्हाला कमिशन मिळेल. हा कमिशन सामान्यतः दहा टक्क्याच्या जवळपास असतो.
खूप सारे लोक ऑनलाईन अफ्फिलीएट मार्केटिंग करून पैसे कमवत आहेत. फक्त एक वेळ अफ्फिलीएट लिंक आपल्याला शेअर करायचा असतो त्याच्यानंतर जेवढे लोक घेतील तेवढा फायदा तुमचा कमिशन नुसार मिळेल. सोशल मीडिया वर तुम्हाला असे खुप लिंक बघायला मिळाले असतील.
मोठमोठ्या ई-कॉमर्स कंपन्या आहेत ज्या अफ्फिलीएट प्रोग्राम करतात जसे, अमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी. तुम्हाला त्यांचे प्रोग्रॅम जॉईन करायची असतील तर मी खाली लिंक देऊन देतो त्यावर क्लिक करून तुम्ही त्यांचे अफेयर प्रोग्रॅम जॉईन करू शकता.
अमेझॉन अफ्फिलीएट प्रोग्राम लिंक : https://affiliate-program.amazon.in
फ्लिपकार्ट अफ्फिलीएट प्रोग्राम लिंक : https://affiliate.flipkart.com