सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा स्मार्टफोन बघायचं नाही.
तेव्हा फोन चार्जिंग वर लावायचा. म्हणजे आपली आंघोळ पाणी होतले मोबाईलची चार्जिंग फुल होऊन जाईल.
जास्त करून पंधरा किंवा तीस मिनिटं मोबाईल वापरा.
त्याच्या पेक्षा जास्त वेळ मोबाईल वापरायचा असेल तर ब्रेक घेतला पाहिजे पाच मिनिटाचा.
त्याच्यानंतर झोपायच्या अर्धा घंटा आधी मोबाईल वापरणे बंद करा.
तुम्ही बाहेर गावी जात असताना मोबाईल एरोप्लेन मोड वर ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे मोबाईलची टावर सर्च करण्याची ऊर्जा वाचेल.
फोनवर बोलत असताना ईअर फोनचा वापर करा किंवा स्पीकर मोडवर ठेवून बोला.
वर शर्टच्या खिशात मोबाईल ठेवू नका मोबाईल त्वचेपासून काही सेंटीमीटर लांब ठेवा.
मोबाईल दोन्ही हातात धरून वापरावा.
मान खाली झुकवून नाही तर हात समोर करून धरावा.
वर करून डोळ्यासमोर जास्त आणू नका.
ब्ल्यू लाईट रिडक्शन ग्लासेस वापरावे.
मोबाईल शंभर टक्के चार्जिंग करण्यापेक्षा 90 टक्केच करावा.
मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवू नये.
ब्लूटूथ हॉटस्पॉट वाय-फाय चा वापर जास्त करू नये.
मोबाईल चा व्हॉल्यूम जास्त वाढवू नये.
माणसाने पूर्णपणे मोबाईल वर डिपेंड राहू नये स्वतःच्या दिमाखही लावून बघावा.