सकाळी लवकर उठण्याची सवय कशी लावायची.

 रोज लवकर सकाळी उठण्यासाठी तुम्हाला लवकर झोपायला सुधा हवे आहे. त्यासाठी तुमचा सगळा दिवसभराचा कार्यक्रम जे काय तुम्ही करत आहात तो बदलला पाहिजे.


तुला सकाळी पाच किंवा सहा वाजताच्या सुमारास उठायचा आहे तर त्यावेळेपर्यंत तुमची झोप पूर्णपणे झालेली पाहिजे जर का तुमची झोप अपुरी झाली तर पूर्ण दिवस आळशीपणा मधे  निघेल त्यासाठी तुमची झोप पूर्ण होणे हे अति आवश्यक आहे. म्हणून जर का आपण सहा किंवा सात तास झोपेसाठी दिले तर त्या वेळात आपली झोप पूर्ण व्हायला हवी. आता आपल्याला सात तास झोपाय साठी असल्यामुळे या सात तास आधी म्हणजे रात्री दहा वाजल्यावर झोपण्याचा प्रयत्न करा.


खूप लोक जेवण झाल्याबरोबर झोपतात पण आपल्याला तसा करायला नाही पाहिजे कारण जेवण केल्यानंतर झोपल्याने जेवण पचायला जड जाते आणि गॅसची समस्या होते. व झोप विस्कळीत होते. त्या मुळे जेवण हा दोन तास आधी करायला हवे. त्यानंतर जेवून दोन तास झाल्यावर झोपायचे आधी थोड्या दूर पायी चालत जाऊन फिरून यावे, असे केल्याने आपल्याला झोप चांगली येते व सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते.


तुम्हाला सध्या रोज सकाळी उठण्याची सवय नसेल तर तुम्ही सवय लागत पर्यंत आलाराम लावून उठू शकता. एकदा का वेळेवर झोपण्याची सवय लागली तर तुम्ही अलार्म न लवताही नक्कीच पहाटेचा टायमावर ज्या टायमावर उठायचे आहे त्याच टाईम वर उठाल.


झोपून झाल्यावर आपली सगळी energy down असते त्यासाठी शरीराला fuel म्हणून सकाळी पहाटे उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यायला विसरू नका. 

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.