पोस्ट्स

आत्मविश्वास कसा वाढवायचा?

जिवंतपणी काहीतरी करून दाखवण्यासाठी self confidence खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही प्रसिद्ध लोकांकडे बघाल तर त्यांच्यात तूम्हाला भरपूर आत्मविश्वास जाणवेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही गोष्टी करण्यासाठी घाबरत आहात. म्हणजे तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे, तर आपण या पोस्ट मध्ये self confidence कसा वाढवायचं ते जाणून घेणार आहोत. 

1. Dressing Sense

 तुम्ही कोणते कपडे लावता याचा परिणाम तुमच्या मूड वर होऊ शकतो. समजा तुम्ही एखाद्या interview ला जात आहात तर चांगले नीटनेटके योग्य कपडे घातल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. त्याच प्रकारे रोज मळलेले कपडे घालण्यापेक्षा स्वच्छ धुतलेले कपडे व वेळेनुसार बदलवणे कधीही चांगले असते.

2. Observe Comfident people

तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांना पाहून जर आपल्यापेक्षा त्यांच्याकडे आत्मविश्वास जास्त आहे असे वाटत असेल तर त्यांचे निरिक्षण करून तुम्हीही तसे करून बघा. 
  • समोरच्या सीट वर बसा. 
  • प्रश्न विचारा/उत्तर द्या. 
  • आपल्या चालणे बसण्यावर लक्ष द्या.
  • Eye contact करा. लपवत जाऊ नका. 

3. Better at one thing

प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीत महान बनणे शक्य नाही, त्यामुळे अशी तुमची आवडती गोष्ट निवडा आणि त्याचा पद्धतशीर अभ्यास करून त्यात पारंगत व्हा. म्हणजे काही गोष्टी नाही जमल्या तरी तुम्हाला एखाद्या गोष्टीत चांगली कामगिरी केल्यामुळे respect मिळेल. आणि तुम्ही Comfident फील करू शकाल. 

4. Remember Achievements

तुमच्या विचारांना (स्वप्नांना) सत्यात उतरवायचा असेल तर तसे मनात imagine करा. आठवा की तुम्ही हजारो लोकांसमोर भाषण देत आहात आणि सगळे लोक टाळ्या वाजवत तुमची प्रशंसा करत आहेत. Imagination चि ताकत खूप powerful आहे त्याचा वापर करा.

5. Don't Fear for Mistakes

कितीही मोठा माणूस असेल तरी त्याच्याकडूनही एकना एकवेळ चूक तर झालीच असेल. आणि आपल्याकडून चुका होतीलच म्हणजे चुका करणे वाईट नाही पण त्यांना वारंवार करणे चुकीचे आहे. जर तुम्ही चुकांमुळे भीत राहाल बाकीचा काम कराल कधी, त्यामुळे चुका करायला भ्या नको. फक्त तुम्ही ट्राय तर करून बघा तुमचा आत्मविश्वास आपणच वाढेल.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.