consumerinfo mahadiscom go green लाईट बिल बघणे

लाईट बिल बघणे

 

मोबाईल नंबर/ ईमेल लिंक : 

         आपले मोबाईल नांबर आपल्या वीज बीला सोबत लिंक करू शकता ज्याने आपल्या मीटर ची रीडिंग किती झाली कधी झाली किती बिल येणार हे तुम्हाला मेसेज आल्यावर कळणार तर तुमचा मोबाईल नंबर जोडण्यासाठी तुमच्या मोबाईल वरून फक्त एक एसएमएस करायचा आहे, तो असा [ MREG (तुमचा १२ अंकी ग्राहक क्र.) आणि 9225592255 ह्या नंबरवर पाठवायचा आहे.
    आपला जोडला गेलेला मोबाईल नंबर किवा ईमेल आयडी चुकीचा असेल तर तुम्ही www.mahadiscom.in वर भेट देऊन दुरुस्त करू शकता.

 

ई – बिलासाठी नोंदणी : 

      विद्युत बिल छापील कागदी बिलाऐवजी ते थेट ईमेल आयडी वरती वीज बिल मिळवन्यासाठी नोंदणी करा याचे फायदे म्हणजे एक कागदांची बचत होईल आणि झाडे वाचतील व दुसरे म्हणजे प्रत्येक ई – बिलवर १०रुपयांचा गो ग्रीन डिस्काउंट मिळेल. म्हणजे म्हणजे कागदी बिल न पाठवता आपल्याला ई मेल वर बिल पाठवला जाईल त्यामध्ये तुम्हाला त्याबिलवर १० रुपयांची कपात झालेली दिसेल.

गो ग्रीन रजिस्ट्रेशन : 

गो ग्रीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा. https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen/php येथे गेल्यानंतर तुम्हाला सध्या म्हणजे आत्त आलेल्या छापील बिलवरील GGN नंबर जो वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात असतो तो टाकावा लागतो. त्यानंतर  तुम्हाला एक कन्फर्माशन ईमेल येईल.

 

ऑनलाईन वीज बिल पेमेंट

     अ) ऍप / वेबसाईट वरील डिस्काउंट ऑफर :

दर महिन्याला इंटरनेट वर वेगवेगळ्या ऍप, वेबसाईट मध्ये तुमचे 50, 500, 1000, 2000 वाचू शकतील असे कितीतरी रिचार्ज कूपन , बिल पेमेंट ऑफर असतात त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो.

     ब) महावितरण कडून विशेष सुट :

जे लोक आपले बिल बँकेतच जाऊन भेरतात त्यांना हे माहीत नाही की आपण जर ऑनलाईन बिल भरले तर कोणत्याही ऑफर्शिवय 0.25 % एवढा सूट डिस्काउंट मिळतो. उदाहरणार्थ, समजा तुमचे जास्तीत जास्त बिल २०००० रुपये आले तर त्याचे भुगतान तुम्ही ऑनलाईन केले तर त्या बिलामागे तुम्हाला सुमारे 500 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. आणि जर वेगवेगळे ऑफर्स  मिळत असतील तर ते वेगळेच होतील.

थकित / विलंब / तत्पर भरणा :

 प्रत्येक महिन्याला येणारा विजेचा बिल  हा बिल आल्याच्या दिनांकापासून ८ किंवा ९ दिवसांत भरणा केल्यास जो काही दिवस गेल्यावर लागणारं विलंब आकार २०, ५० रुपये असतो तो लगेच बिल भरल्याने द्यावा लागत नाही वरून तत्पर देयक भरणा महणून काही पैशांची बचतही होते.
हा लेख पूर्ण वाचल्याबाबत धन्यवाद, काही शंका असतील तर कॉमेंट करू शकता.

Leave a Comment