सगळेजण मोबाईल वापरतात हे काही सांगायची गोष्ट नाही पण कोणती गोष्ट किती वापरावे याचे एक लिमिट असते. लिमिट च्या अंदर राहणाऱ्या माणसाला लिमिटेड म्हणतात आणि त्या लिमिट च्या बाहेर असणाऱ्या माणसाला व्यसनी माणूस म्हणतात म्हणजेच तुम्ही जर कोणत्या गोष्टीचा अती वापर करत असाल तर तुम्ही त्या गोष्टीच्या आहारी गेले आहेत असे समजावे.
मोबाईलचा अती वापर आता खूपच लोकं करायला लागले आहेत. याचा काय परिणाम होत आहेत त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या शरीरावर या तिकडे कोणी लक्ष देत नाही आहेत. आपण जर याच्या परिणामाकडे बघितले तर खूप वाईट परिणाम आपल्याला दिसतील. जसे की,
मोबाईलच्या अतिवापरामुळे वेगवेगळ्या बीमारी व्हायला लागले आहेत.
उदाहरणार्थ,
- एकाच हातात मोबाईल जास्त वेळ धरून राहिल्याने हात दुखायला लागते.
- मोबाईल कडे एकटक बघितल्याने डोळे दुखतात, बरोबर दिसत नाही, आखरी चष्मा लावायची पाळी येते.
- मान खाली करून बघत राहिल्याने पाठ दुखायला लागते.
- रस्त्यावरून जात असताना मोबाईल वापरल्याने एक्सीडेंट होण्याचा धोका असतो.
- सतत इंटरनेट वापरल्याने कॅन्सर होण्याचा धोका असतो.
- सोशल मीडियाचा वापर केल्याने नैराश्य यायला लागते आणि त्यातूनच इतर मानसिक बिमाऱ्या तयार होतात.