पोस्ट्स

कर्करोग आणि जीवनसत्वे

सर्व जीवनसत्वे शरीराला अत्यंत उपयुक्त असतात व ती आपल्या आहारातूनच मिळवावी लागतात. हल्ली केलेल्या शंशोधवरून असे आढळून आले की, जीवनसत्वे अ, ब, आणि इ ही कर्करोगाला विरोध करण्यासाठी फार उपयोगी असतात.

जीवनसत्व ' अ ' : शरीरातील प्रत्येक पेशी निरोगी राहण्यासाठी उपयुक्त असते आणि त्याची उपयुक्तता विशेषतः फुफ्फुस, घसा, अ्ननलिका, गुदांग, प्रोटेस्ट ग्रंथी यांच्या पेशींची नीट जोपासना करण्यास v त्यांच्यात कर्करोगाला विरोध करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. जीवनसत्व अ यकृत, क्याडलीव्हर यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात आढळते. पिवळ्या रंगाची फळे, भाज्या, (उदा. पपई, गाजर) पालेभाज्यात बीटा कॅरोटीन असते, ज्याचे सगळ्यात जीवनसत्व अ मधे रूपांतर होते व ते शरीराला कर्करोग पासून संरक्षण देऊ शकते. प्रयोगाअंती असे आढळून आले की, बीटा कॅरोटीन फुफुसाच्या कर्करोगाला प्रतिबंध करू शकते. कर्करोग आटोक्यात ठेऊ शकते. बीटा कॅरोटीन ने फुफुसाचे कर्करोग बरे झाल्याची उदाहरणे उपलब्ध आहेत. तेव्हा आपल्या आहारात भाज्या, पालेभाज्या, फळे, यांचा वापर करणे हितावह ठरेल.

जीवनसत्व ' ब ' : आहारात जीवनसत्व ब ची कमतरता झाली तर तोंड येते, तोंडात व्रण येतात आणि त्यांच्यावर जर योग्य इलाज केला नाही तर त्यांचे रूपांतर कर्करोगात होण्याचे संभाव असतो. म्हणून शरीराचे संरक्षण करण्यासाठी जीवनसत्व ब उपयुक्त ठरतो.

जीवनसत्व ' क ' : प्रक्रिया केलेले मांसल पदार्थ टिकवीन्यासाठी सुरक्षित राहावेत म्हणून त्यांच्यात nitrate torrsewalive म्हणून घालतात. शरीरात nitrate चे nitrosanine जे कर्कजन्य असते ते त्यात होते. जीवनसत्व क शरीरात nitrosanine तयार होण्यास प्रतिबंध करते आणि अन्ननलिकेत कर्करोग होण्यापासून वाचवते. शरीराची प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. जीवनसत्व क आवला, पेरू, लिंबू, संत्री, मोड काढलेली कडधान्ये, पालेभाज्या, शेवग्याच्या शेंगा, या सर्वात भरपूर प्रमाणात मिळते.

जीवनसत्व ' इ ' :  जीवनसत्व इ शरीरात anti oxidant म्हणून काम करते. यात सिलेनियमची गरज असते. ही दुक्कल शरीराला कर्करोग पासून संरक्षण देते. सिलेनियम सर्व तृण आणि कडधाण्यात व यीस्ट मधे भरपूर प्रमाणात असते. जीवनसत्व इ हे तेले, तृण व कडधण्यात भरपूर प्रमाणात मिळते.


आहारात काय टाळावे

आहारात सिग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असावे.
प्रक्रिया केलेले पदार्थ व पेये कमी प्रमाणात असावे.

मसाल्याचे पदार्थ खाऊ नका. उदा. मटण, मच्छी

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.