अन्नपदार्थ हाताळण्याबाबत व शिजविण्याबद्दल काही सूचना

अन्नपदार्थ शिजवताना कोणती काळजी घ्यावी

मित्रानो आपण आपले आरोग्य सर्वप्रथम ठेऊन आपल्या आहारात नियमितपणे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त घटक समाविष्ट करणे आवश्यक आहे आहेत, तुम्ही तुमच्या सवयंपाक घरात स्वयंपाक करत असाल तर ते उपयुक्त घटक कोणते आणि कसे हाताळावे व शिजवावे ह्याच्याबद्दल माहिती जाणून घ्या.


अन्नपदार्थ हाताळण्याबद्दल व शिजविण्याबद्दल सूचना


 1. अन्न शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी न टाकणे व जास्त झालेले पाणी फेकून न देणे, भाज्या पहिल्यांदा स्वच्छ धुणे व नंतर कापने. असे केले नाही तर आहारातील जीवनसत्व व खनिजे पाण्याबरोबर वाहून जातील.
 2. अन्न शिजवताना सोडा न टाकणे, कारण सोड्यामुळे जीवनसत्वांचा नाश होतो.
 3. अन्न पुष्कळ वेळ उघड्या भांड्यात शिजवू नये. ते पेशर कूक मधे शिजवावे. कारण त्यामुळे जीवनसत्वांचा नाश अगदी अल्प प्रमाणात होतो.


पारंपरिक आहारात थोडा बदल करण्याबद्दल सूचना


 1. गव्हाचा आटा चालल्याशिवाय वापरणे. कारण त्याला कोंडा हा उपयुक्त घटक आहे व तो चाळल्यामुळे निघून जातो.
 2. मैदा आट्यापेक्षा कमी पोष्टिक असल्यामुळे त्याचा वापर अगदी कमी प्रमाणात करावा.
 3. तळलेले पदार्थ पचायला जास्त कठीण असल्यामुळे त्यांचा वापर कमी करावा. वाफ्लेले पदार्थ जास्त प्रमाणात वापरावेत.
 4. आंबविलेले पदार्थ उदा. इडली, ढोकळा वैगरे यांचा वापर जास्त प्रमाणात करावा. कारण आणण्याच्या प्रक्रीयेत प्रथिने पचायला जास्त सोपी होतात आणि ब व क जीवनसत्वांचा प्राणावर वाढ होते. डाळी ऐवजी मूळ काढलेली कडधान्ये जास्त प्रमाणात वापरावेत.
 •  डाळीपेक्षा कडधान्ये स्वस्त, पण जास्त पौष्टिक असतात.
 •  ब जीवनसत्व त्यात जास्त प्रमाणात असतात.
 •  क जीवनसत्व जे डाळींमधे नसते ते कढधान्यात जास्त असते.
 •  प्रथिने पचायला जड सोपी होतात आणि
 •  लोह जास्त प्रमाणात मिळण्याची शक्यता असते.

 कडधान्यांप्रमाने तृणधान्यानाही मोड काढून वापरावे व वरील दिलेले फायदे पदरात पाडून घ्यावेत.

   गहू, तांदळाबरोबर बाजरी, नाचणीचाही वारंवार व नियमितपणे उपयोग करावा. कारण बजरित लोहाचे प्रमाण जास्त असते, तर नाचनित चुन्याचे प्रमाण जास्त असते. तेव्हा गहू, तांदळा बरोबर बाजरी, नाचणीचा वापर केल्यास आरोग्याच्या दृष्टीने हितावह होईल. शेवटी हेही लक्षात घ्यायला हवे की, पाणी हा आहारतला एक आवश्यक घटक आहे आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी दर दिवशी 5 - 6 ग्लास पाणी प्यायला हवे.

आपल्याला अजून काही सांगावेसे वाटत असल्यास आपण खाली कॉमेंट करावा,

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.