तर मित्रांनो मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्याघरी आधीपासूनच एक कुत्रा होता कदाचित तो आमच्या आजी आजोबा यांनी ठेवला असेल. तो खूप छान होता. कुणीही नवीन व्यक्ती घरी आले तर त्यांच्यावर तो ओरडत असे पण एकदा का त्याच्यावरून हत फिरवले तर तो शांत होत होता. त्याला आम्ही कुठेही फिरायला बाहेर नेत होतो त्याला आम्ही आमच्यासोबत जेवायला देत होता एक दिवस तो अचानक गायब झाला व परत कधी आलाच नाही.
त्याचबरोबर आमच्या घरी मांजरेही खूप होती. ते घरामध्ये या खोलीतून त्या खोदूध घेण्यासाठी लीत हिंडत फिरत असत आणि घरची दही-भाकर, भात-भाजी इत्यादी तिखट गोड पदार्थ उघड्यावर दिसले ते खाऊन टाकत असत.
तसेच आमच्या कडे गायी आणि बैल सुद्धा होते. गायीला वासरू झाल्यावर दूध पित असे आणि आम्ही थोडासा चहा मधेही टाकत होतो. बैल शेतीच्या कामासाठी वापरले जात होते. जंगलातून काहीही आनासाठी व धान, तांदूळ यांच्या दळण वळणासाठी बैल बंडीसोबत जुपले जात.
आमच्या घराच्या बाजूला जो परिवार होता त्यांच्याकडे तीन ते चार म्हैस होते. ते त्यांच्यापासून दुधाचा व्यवसाय करत, लोकं त्यांच्या कडे दूध घेण्यासाठी जात आणि मालकाला पैसे मिळत.
आमचा जो गायबैल बैल बांधायचा गोठा होता त्यामधे शेळ्या पण होत्या आमच्याच. म्हणजे आम्ही एक शेली घेऊन तिचा पालन पोषण करून तिला चारा देऊन किंवा बाकीच्या शेळीचा जो कळप चरायला जातो त्या कळपामधे चरायला पाठवत होतो. जर तिला लहान बछडा/पाठरू झाला तर त्याचे लहानाचे मोठे करून. तो शेळी असेल तर पुन्हा शेळी होईल म्हणून ठवणार जर बक्रा असेल तर त्याला कापून त्याची मटण विकले जात होते आणि फायदा त्याच्या मालकाला होत होता.