माझा ईमेल आयडी | ईमेल आयडी तयार करणे | तुम्हाला ईमेल पाठवता नाहीं येत का?

ईमेल आयडी म्हणजे काय?

कुणा कुणाला तर ईमेल म्हणजे काय असते तेच नाही समजत. तर मित्रांनो घाबरु नका आपला NGSभाऊ आपल्या सोबत आहे. जसं सगळे लोक मोबाईल वापरतात तसा त्यांचा एक सगळ्यांपेक्षा वेगळा एक प्रकारचा दहा अंकी मोबाईल नंबर असतो तश्याच प्रकारे इंटरनेटचा वापर करण्यासाठी सुधा एक ईमेल आयडीची आवश्यकता असते. जसा बिना सिम ने मोबाईल चालतो तसा इंटरनेट ही चालते पण कुणाला फोन करायचा असेल किंवा मेसेज पाठवायचा असेल तर तसाच इंटरनेटद्वारे मेसेज पाठवायचा असेल किंवा वेबसाइट्सवर sign up करायचे असेल तर ईमेल आयडी पाहिजे. आता मोबाईल नंबर देणाऱ्या वेगवेगळ्या ऑपरेटर कंपन्या आहेत की नाही जसे जिओ, बीएसएनएल, आयडिया, एअरटेल इत्यादी तश्याच प्रकारे ईमेल आयडी बनवायच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत जसे Gmail, Rediffmail, Yahoomail इत्यादी.

ईमेल आयडी तयार करणे

 जास्त लोक जे वापरतात ते gmail आहे म्हणून आपण सुद्धा ह्याकडून ईमेल बनवून घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या ब्राऊझर मधे www.gmail.com उघडा. त्यात Register वर क्लिक करा. तुमचा नाव गाव पत्ता जनमतरिख मोबाईल नंबर इत्यादी नोदणी करा आणि तुम्हाला जी ईमेल आयडी पाहिजे जसे की tumchanav@gmail.com किंवा navtumcha@gmail.com की वेगळा असावे ते तुमचं तुम्ही ठरवा म्हणजे तुमची आयडी तयार होईल.

ईमेल कसा पाठवायचा?

तुमच्या मोबाईल मधे असलेला gmail ॲप उघडा. किंवा ब्राऊझर मधे www.gmail.com लिहा. 
तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून log in करा. त्यानंतर COMPOSE लिहून असलेल्या बटणावर पेन्सिल सारख्या दिसत असलेल्या बटणावर क्लिक करा. तुम्हाला समोरच्या फोटो प्रमाणे माहिती भरावी लागेल.

From - म्हणजे कुणाकडून पाठवायचा आहे त्याचा ईमेल आता तुम्ही पाठवत आहा म्हणून तुमचा ईमेल आयडी लिहिलेला असेल.
To - म्हणजे कुणाला पाठवायचा आहे त्या दुसऱ्याचा ईमेल आयडी तेथे लिहा.
Subject - तुम्ही हा ईमेल का पाठवत आहेत त्याचा विषय लिहा.
Compose email - तुम्हाला काय लिहून पाठवायचा आहे ते जेवढं पाहिजे तेवढं तिथे लिहा.

वरती उजव्या बाजूला गोलगोल असलेल्या Attach Pin ने फोटो किंवा डॉक्युमेंट २५mb पर्यंत जोडू शकता.
आणि त्याच्या बाजुला त्रिकोण आकाराचा बान असेल Send Button वर क्लिक करून तुमचा ईमेल पाठवू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.