सोशल मीडिया डिटॉक्स म्हणजे काही काळासाठी सोशल मीडियापासून दूर राहणे.
तुम्हाला सोशल मीडिया डिटॉक्स करायचा असेल तर आपल्या मोबाईल मधले सगळे सोशल मीडिया अँप्स अनइन्स्टॉल करा.
सोशल मीडिया साईट्स ब्लॉक करा.
आता टाईम ठरवा. किती दिवसासाठी तुम्हाला सोशल मीडिया डीटॉक्स करायचा आहे. एक दिवस, दोन दिवस, एक हप्ता, एक महिना का वर्षभर आधी ठरवा. मग तेवढ्या वेळासाठी पूर्णपणे सोशल मीडियाचा वापर करणे बंद करा. अजिबात सोशल मीडियाला हात नाही लावायचा. वरून झुकुनही नाही पाहायचा.
सोशल मीडिया चा वापर करणे विसरूनच गेले पाहिजे असे समजा. एकदा ठरवलेले टाइम कमी नको करा, जेवढे टाईम ठरवले आहे तेवढ्या काळापर्यंत मजबूत राहा.
सोशल मिडियाची खूप वाईट सवय आहे. एक वेळ हात लावला की ते सुटत नाही. एकदाच स्क्रोल करायला सुरुवात केलं तर ते स्वाइप अप होतच राहते. एकदा नाही करायचा असे ठरवले नंतरही ते करायला लावते.
आता एक दिवस झाला असेल तुमचा तरी स्वतःला एक रिवार्ड द्या. रिवार्ड ही तुमची एक आवडती वस्तू असू शकते.
जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही सोशल मीडियाच्या आहारी गेल्यात, जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही सोशल मीडियाला व्यसनी झाले आहात तेव्हा तेव्हा सोशल मीडिया डिटॉक्स करत जाहा.
तुम्हाला या लेखाबद्दल काय वाटते ते खाली कमेंट करून सांगा.