ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना घ्यावयाची काळजी.

नमस्कार मित्रांनो, 
  तुमचे स्वागत आहे.
     जर तुम्ही ऑनलाईन देवाण घेवाण करत असाल, पैसे ट्रान्स्फर किंवा ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुम्हाला सावध असणे फार गरजेचे आहे.
भारतामध्ये ऑनलाईन फ्रॉड झाल्याचे अनेक घटना मागच्या वर्षी झालेल्या आहेत. आणि यांचा आकडा डिजिटायझेशन मुळे दरवर्षी वाढतच जान्याची शक्यता आहे.
त्यामुळे मी जे आपल्या करिअर मधे ऑनलाईन व्यवहार करत असतो. यामधे मी हे अनुभवले आहे की आपल्याला जसे दैनंदिन जीवनात चोर, लबाडखोरांपासून जपायचे असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे तसेच ऑनलाईन असताना सुद्धा सुरक्षितता असायला पाहिजे त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या तुम्हाला मदत होईल.


1. लिंक्स
तुम्हाला इंटरनेट वर भरपूर अशा लिंक्स मिळतील जे लोक सांगत असतात की तुम्हाला तुम्हाला भरपूर फायदा मिळणार अश्या फसव्या लिंक्स वर क्लिक करणे टाळा.

2. फ्रॉड कॉल/एसएमएस
जास्तीत जास्त वेळा फ्रॉड कॉल आणि एसएमएस मुळे लोकांची फसवणूक झाली आहे त्यांचे नुकसान झाले आहे अश्या घटना पोलीस ठाण्यात येत असतात. लोकांना फ्रॉड कॉल/एसएमएस मधे त्यांना तुम्ही लॉटरी जिंकली आहे किंवा लकी ड्रॉ मध्ये विजयी झाले आहेत, रक्कम मिळवायची असेल तर तुम्ही असे/तसे करा म्हणले जाते. असे तुमच्या सोबत होत असेल तर त्यांना ब्लॉक करायला विसरू नका.

3. जाहिरात
इंटरनेट वापरताना तुम्ही बघत असाल की खूप जाहिराती पहायला मिळतात. एकदा का कुठे क्लिक झाले तर ते तुम्हाला दुसऱ्याच पानावर घेऊन जातात. तर तेव्हा तुम्हाला ह्या त्या जाहिरातींना समजायचे आहे वीणा कारण कुठल्याही जाहिरातींवर क्लिक करणे तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते जर ते तुमचे details मागत असतील.

4. वेबसाइट्स
ऑनलाईन व्यवहार करताना खूप साऱ्या वेबसाइट्स असतात तर नेमके व्यवहार करायचे तर कोठून? ती वेबसाईट सुरक्षित आहे हे कसे ओळखाल? तर ते ओळखण्यासाठी तुमच्या ब्राऊझर मध्ये त्या वेबसाईटची url ची सुरुवात बघा : ती वेबसाईट http असेल तर तिथे कोणतीही माहिती देणे जसे बँक डिटेल्स, कार्ड डिटेल्स बद्दल माहिती देणे धोक्याचे ठरू शकते. जर एखाद्या वेबसाईटची सुरुवात https ने होत असेल तर ते secure मानली जाते तर त्यावर काही हरकत नसते.

5. पासवर्ड
पासवर्ड सगळ्या व्यवहारासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला तुमचा कठीण पासवर्ड, कुणीही ओळखू न शकणारा पासवर्ड, कुण्याही जागी एकच नसणारा पासवर्ड, खूप गुंता गुंतीचा असणारा पासवर्ड कुणाला सांगा नको कुठे लिहून ठेवू नका. इंटरनेटवर कुठेही टाकू नका. विसरू नका.

6. ओटीपी
याचा वापर आपली माहिती दुसऱ्यांपासून सुरक्षितता पडताळण्यासाठी होतो. हा एक वेळचा पासवर्ड असतो. जो आपले साक्ष पटविण्यासाठी आपल्या मोाईलवर किंवा ईमेलवर पाठवला जातो. हे फक्त काही कालावधी साठी मर्यादित असतात याचा दुसऱ्या दिवशी वापर केला जात नाही. तुम्हाला गरज असेल तरच याची आवश्यकतेनुसार जसे की पासवर्ड हरवला तर किंवा पेमेंट करायचा आधी वापर होतो. कुणालाही सांगायचे नसते. जर दुसऱ्याच्या हाती लागले तर एका ओटीपी मुळे खूप काही होऊ शकते.


ऑनलाईन पेमेंट करायच्या कोणकोणत्या पद्धती असतात ते खालील पोस्ट वाचून समजू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.