what is seo in marathi | seo म्हणजे काय


  या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी वापरत असलेल्या माझ्या मराठी ब्लॉग/वेबसाईट गुगलच्या शोध परिणामांमध्ये येण्यासाठी सर्च इंजिन ओप्टीमायझेशनच्या काही खास युक्त्या ज्या तुम्हाला ला गूगल सर्चच्या रिझल्टट्समधे तुमचे ब्लॉग/वेबसाईट रँक करण्यास मदत करतील.


1. शब्द संख्या :

तुमच्या पोस्टची शब्द संख्या कमीतकमी 5०० शब्दांपर्यंत किंवा जास्तीत जास्त असू द्या. काही लिहीत असताना टॉपिक नुसार लिहा म्हणजे वाचायला सोपं जाईल. आणि योग्य जागी बोल्ड, इटलिक, उंडरलाईन, पॉराग्रफ नुसार लीहण्याचा प्रयत्न करा.


2. फोटो :

 एकतरी स्वतः एडिट केलेली फोटो जोडा म्हणजे तुमचे पोस्ट मध्ये निव्वळ अक्षरं दिसण्यापेक्षा जरा शोभुन दिसेल आणि तुम्ही जोडलेली फोटो ही तुमच्या ब्लॉग/वेबसाईट वरती थंम्बनेल म्हणूनही वापरली जाईल. पण चुकून तुम्ही गूग्लेवरती उपलब्ध असलेल्या फोटोचा वापर करू नका कारण त्यांचे कॉपीराइट असते, कोणतीही फोटो वापरताना ती फोटो कॉपीराइट फ्री आहे का? हे तपासून पाहा .

3. शीर्षक

 लोकांना समजेल असा शीर्षक बोल्ड करा आणि साईज मोठं असू द्या. कारण कोणतीही लोकं प्रत्येक पोस्टचा शीर्षक पाहूनच त्याच्यावर क्लिक करत असतात, आणि हो थोडस डिस्क्रीप्शन लिहायला विसरू नका कारण याने लोकांना त्या पोस्ट मध्ये काय आहे हे थोडक्यात माहिती व्हायला पाहिजेत.


4. ट्रॅफिक :

 सर्च केल्या जात असलेल्या टॉपिक वर पोस्ट लिहा म्हणजे जेव्हा गुगल सर्च मधे कोणती गोष्ट शोधली जाईल तेव्हा तुमचा लिहिलेला लेख दिसायला पाहिजेत. आणि तुमच्या सोशल मीडिया साईट वर तुम्ही तयार केलेली पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत सामायिक करा ज्याने तुमच्या युजर्सची संख्या वाढण्यास तुम्हाला मदत होईल.


5. इंडेक्स :

तुमची तयार केलेली साईट गुगल सर्च कन्सोल मधे साईट एड करा ज्याला आपण वेबमास्टर टूल्स सुधा म्हणतो.

असे केल्याने तुमचं ब्लॉग/वेबसाईट हा गुगलच्या सर्च रिझल्ट्स मधे जोडला जाणार. पण तुमची पोस्ट ही गुगल मधे जोडली गेली आहे हे तुम्हाला माहीत कसे होणार त्यासाठी site:siteadress टाकून गुगलमध्ये सर्च करा ज्याने तुमच्या वेबसाईट इंडेक्स झाली की नाही हे कळेल.
ह्या टिप्स वापरून तुम्ही एक चांगले  ब्लॉग तयार करू शकता. पण तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी कमीपणा आहे किंवा अजून काही माहीत करून घ्यायचं असेल तर खुशाल कॉमेंट करा आम्ही ही लवकरच अपडेट करू,
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

© NGS VARWADE. All rights reserved.