एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.
प्रेम म्हणजे,
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.
तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस.
प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.🌠💖
जोडीदार सुंदर नाही..
कदर करणारा असला पाहिजे ❣️👫