स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते,कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो..!!!
रागात बोललेला एक शब्द
एवढा विषारी असतो की…
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना
एका क्षणात संपवुन टाकतो…!!!
माफीचा खरा अर्थ तुमच नात
टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या
व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते ..
मदत करण्यासाठी
कारणांची गरज नसते..
नाती कधी जबरदस्तीने बनत
नसतात ति आपोआप गुंफली
जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात
काही जण हक्काने राज्य करतात..
दुसर्याच्या आयुष्याला सुखाची
चादर दयावी पण आपल्या खुशी
साठी दुसर्याची चादर खेचु नये….
तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण
जर तुमची जीभ गोड असेल तर हे
जग तुमच्या प्रेमात पडेल….माणसाला
बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष
लागतात …पण “काय बोलावे”हे शिकण्यास
पूर्ण आयुष्य निघून जाते..
जरी झाडाची पाने गळाली तर
त्यांची जागा दुसरी पाने नव्याने घेतात..
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,
बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर नात्यांमध्ये आणखी दुरावा येईल.
एखाद्या व्यक्तीला इतका पण त्रास देऊ नका की त्याला त्याच जीवन नकोस वाटेल.
हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकली पाहिजे तेव्हा त्या हक्काला किंमत असते.