Marathi Ukhane मराठी उखाणे

marathi ukhane for husband, marathi ukhane for bride, marathi ukhane funny, marathi ukhane for sankranti, marathi ukhane male, ukhane marathi for female, ukhane marathi for male, ukhane मराठी. marathi ukhane for female romantic, marathi ukhane for male funny, marathi ukhane for female funny, marathi ukhane for husband, marathi ukhane for male romantic, marathi ukhane for wife

 

नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!

 

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

 

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते,
चातकपक्षाची काया,
….रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!

 

तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,
…. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.

 

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
…..नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.

 

दारावर लावले झेंडूचे तोरण
…..चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण

 

सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट
……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट

 

मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
….च्या स्पर्शाने उमटले झंकार..!

 

एका वर्षात असतात महिने बारा,
…. च्या नावात समावलाय आनंद सारा.

 

लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
…. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.

 

सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
.. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!

 

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

 

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,
आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.

 

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
…. रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.

 

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
…. राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

 

आंबा गोड, ऊस गोड,
त्याहीपेक्षा अमृत गोड,
…..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

 

वादळ आलं,
पाऊस आला,
मग आला पूर… हिचं नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर.

 

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
…. चे नाव घेतो ऐका देऊन कान.

 

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

 

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
…. च्या साथीने आदर्श संसार करीन.

 

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

 

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

 

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी..

__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी

 

 

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
___आहे, माझ्या Life चा Server

 

 

Leave a Comment